!! जिप्सम - एक प्रभावी भूसुधारक !!
जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते. माती परिक्षण करून जिप्समची गरज ठरविल्यानंतर आवश्यकतेच्या अर्धा भाग जिप्सम पहिल्या वर्षी आ णि उरलेला अर्धा भाग जिप्सम दोन वर्षांनंतर वापरावा. जिप्सममध्ये एक टक्केपेक्षा जास्त सोडियम ऑक्साईडचे प्रमाण असु नये. जिप्सम पावडर जमिनीच्या पृष्ठभागावर वरच्या २० सें.मी. थरात चांगली मिसळुन घ्यावी म्हणजे पावसानंतर भरपुर पाणी मिळुन जिप्समची प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. जिप्सममधील कॅल्शियमची मातीच्या चिकण कणांना चिकटलेल्या सोडीयमशी प्रक्रिया होऊन सोडियम सल्फेट विद्राव्य असल्याने त्याचा जमिनीतुन निचरा होऊन जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक कमी होतो आणि जमिनीची भौतिक जडण-घडण सुधारते. त्यामुळे मातीच्या कणांवरील सोडियम दूर होऊन जमिनीच्या जडणघडणीत सुधारणा होते. सामू कमी होतो व मुळांची चांगली वाढ होते. अन्नद्रव्यांचे ...