क्षारपड जमिनीसाठी एक उपयुक्त भूसुधारक – जिप्सम
सिंचन क्षेत्रातील भारी काळ्या आणि नदीकाठच्या पोयटायुक्त जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार आणि विनिमय सोडिअमचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या जमिनी क्षारयुक्त व चोपण झाल्या आहेत. नदीकाठच्या आणि कालवा सिंचन क्षेत्रातील क्षार व चोपणयुक्त जमिनीच्या भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मावर अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत.
सिंचन क्षेत्रातील भारी काळ्या आणि नदीकाठच्या पोयटायुक्त जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार आणि विनिमय सोडिअमचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या जमिनी क्षारयुक्त व चोपण झाल्या आहेत. नदीकाठच्या आणि कालवा सिंचन क्षेत्रातील क्षार व चोपणयुक्त जमिनीच्या भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मावर अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात वर्षानुवर्षे साठतात. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, क्षार जमिनीवर साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनतात. क्षार जमिनीत साठल्यामुळे जमिनीचा सामू वाढतो. जमिनीच्या सामूचा (पीएच) पिकाच्या वाढीवर प्रत्यक्ष परिणाम होतो, कारण पिकाच्या वाढीसाठी लागणारी बहुतांश अन्नद्रव्ये ही जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसात असताना पुरेशा प्रमाणात पिकांना उपलब्ध होऊ शकतात; पण सामू जास्त असल्यास जमिनी क्षारपड आणि चोपण होऊन नापिक होतात. ज्या वेळी जमिनीचा सामू आठपेक्षा जास्त, क्षारांचे प्रमाण चार डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते आणि विनिमययुक्त सोडिअमचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा कमी असते. अशा जमिनीस खारवट जमीन असे म्हणतात. तर ज्या जमिनीचा सामू ८.५ पेक्षा जास्त, क्षारतेचे प्रमाण चार डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी आणि विनिमययुक्त सोडिअमचे प्रमाण १५ टक्केपेक्षा जास्त असते, अशा जमिनीस चोपण जमिनी म्हणतात. या जमिनीच्या सुधारणेसाठी जिप्सम किंवा आयर्न पायराईट या भूसुधारकांचा वापर केला जातो.
जमिनी क्षारपड होण्याची कारणे:
उष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस कमी असल्यामुळे जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही. सिंचन क्षेत्रात भारी चिकण मातीच्या अतिखोल काळ्या, निचरा कमी असलेल्या जमिनीस अतिरिक्त पाण्याचा वापर जास्त होतो. नैसर्गिक ओढे, नाले बुजवून जमिनींची ठेवण सखल भागात केल्याने भूमिगत नैसर्गिक निचरा कमी झाला आहे. त्यामुळे क्षार जमिनीतच साठू लागले आहेत. कालवा सिंचन क्षेत्रात कालव्याच्या बाजूने कॉंक्रिट मुलामा न केल्याने पाण्याच्या पाझरामुळे आजूबाजूच्या जमिनी पाणथळ होऊन क्षार व चोपणयुक्त बनल्या आहेत. जास्त पाणी लागणारे उसासारखे पीक वारंवार घेतल्याने व पिकांची फेरपालट न केल्याने जमिनी क्षारपड होत गेल्या आहेत. राज्यातील जमिनी अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनल्या आहेत. त्यामध्ये अल्कधर्मीय खनिजांचे प्रमाण जास्त आहे. खनिजांचे विघटनानंतर मुक्त क्षार जमिनीत साठतात. सिंचनास क्षारयुक्त पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढते आहे.

"जिप्सम' म्हणजे काय?
खाणीत आढळणारा रॉक फॉस्फेट याच्यापासून सुपर फॉस्फेट हे रासायनिक खत तयार केले जाते. या प्रक्रियेत कॅल्शिअम सल्फेट हा उपपदार्थ तयार होतो, जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. जिप्सममध्ये कॅल्शिअमचे प्रमाण १५ ते २५ टक्के, तर गंधकाचे प्रमाण ४० ते ४५ टक्के असते. जमिनीत जिप्सम टाकल्यानंतर रासायनिक अभिक्रिया होऊन चिकण मातीच्या कणावर असलेला सोडिअम क्षार सुटा होऊन कॅल्शिअम मातीच्या कणांवर बसतो आणि सोडिअम सल्फेट क्षार निचरा व्यवस्थेतून पाण्याद्वारे बाहेर पडून चोपण जमीन सुधारण्यास मदत होते . विशिष्ट कालावधीनंतर जिप्सम ५० ते ६० बॅग / एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. जिप्सममुळे चोपण जमीनचे सुधारित जमिनीत रुपांतरीत करता येते.
जिप्समच्या वापरामुळे होणारे फायदे -
1. जिप्सममुळे जमीन भुसभुशीतहोऊन जमिनीची सुपीकता वाढवते.
2. जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
3. क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात व ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
4. बियाण्याची उगवण चांगली होते.
5. जमिनीची धूप कमी होते.
6. पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
7. जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
8. जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
9. भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
10. जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो.
11. जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
12. जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
13. जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
14. जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत. पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात करत नाहीत कारण त्याचे महत्त्व अजून शेतकरयांना माहित नाही. कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे जिप्समचा वापर त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा.
प्रा. पूनम घार्गे – निंबाळकर, प्रा. सस्ते सोनाली, प्रा. करपे अश्विनी, कृषी महाविद्यालय, बारामती

Comments
Post a Comment