!! जिप्सम - एक प्रभावी भूसुधारक !!


जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते. माती परिक्षण करून जिप्समची गरज ठरविल्यानंतर आवश्यकतेच्या अर्धा भाग जिप्सम पहिल्या वर्षी आणि उरलेला अर्धा भाग जिप्सम दोन वर्षांनंतर वापरावा. जिप्सममध्ये एक टक्केपेक्षा जास्त सोडियम ऑक्साईडचे प्रमाण असु नये. जिप्सम पावडर जमिनीच्या पृष्ठभागावर वरच्या २० सें.मी. थरात चांगली मिसळुन घ्यावी म्हणजे पावसानंतर भरपुर पाणी मिळुन जिप्समची प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. जिप्सममधील कॅल्शियमची मातीच्या चिकण कणांना चिकटलेल्या सोडीयमशी प्रक्रिया होऊन सोडियम सल्फेट विद्राव्य असल्याने त्याचा जमिनीतुन निचरा होऊन जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक कमी होतो आणि जमिनीची भौतिक जडण-घडण सुधारते. त्यामुळे मातीच्या कणांवरील सोडियम दूर होऊन जमिनीच्या जडणघडणीत सुधारणा होते. सामू कमी होतो व मुळांची चांगली वाढ होते. अन्नद्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.





जिप्समचे फायदे :-
१) जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते.
२) जमीन भुसभुशीत होते.
३) जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
४) क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
५) बियाण्याची उगवण चांगली होते.
६) पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
७) जमिनीची धूप कमी होते.
८) पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
९) जमिनीतील कॅल्शियम – मॅग्नेशियमचे प्रमाण सुधारते.
१०) सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
११) जिप्सम मुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
१२) जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
१३) भुईमुग, कलिंगड, टोमॅटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
१४) जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो.
१५) जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
१६) जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकाला चिटकत नाही.
१७) जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
१८) जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत. त्याच बरोबर कॅल्शियम व चुना देखील भूसूधारक म्हणून वापरता येतात.
अ) कॅल्शियमचा वापर भूसुधारकांमध्येही होतो. कॅल्शियमयुक्त खतांचा वापर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी आणि मातीची जडणघडण चांगली राखण्यासाठी केला जातो.
ब) चुन्याचा भूसुधारक म्हणून वापर करताना जमिनींची आम्लता कमी करण्यासाठी चुना (कॅल्शियम कार्बोनेट) कणांचा आकार ०.२५ मि.मी. पेक्षा अधिक (जाड, भरड) असल्यास अधिक फायदेशीर ठरते. तसेच अाम्लधर्नी जमिनीत फळपिकांची लागवड करावयाची झाल्यास लागवड करायच्या आधी ७ ते ८ महिने चुन्याचा वापर करणे फायदेशीर ठरतो. तसेच हिवाळ्यात जर चुना मातीत मिसळला तर ते जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

क्षारयुक्त जमिनीच्या शास्त्रीय ( जिप्सम ) सुधारणेमुळे पीक उत्पादनात १० ते ५० टक्के वाढ

जिप्समच्या वापरामध्ये लक्षात घेण्यासारख्या गोष्टी:

किसान जिप्सम का उपयोग क्यों, कब और कैसे करें ?